*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *26/09/2016*दिनांक 20 सप्टेंबर 2016 च्या दिलेल्या सूचनेनुसार 26 सप्टेंबर 2016 ही student पोर्टल आणि स्कूल पोर्टल ची शाळा स्तरासाठी अंतिम मुदत दिलेली असूनही अद्यापही काही थोड्या शाळांचे student आणि स्कूल पोर्टल चे शाळा स्तरावरील काम अपूर्ण राहिल्याने काही महत्वाच्या सूचना या post द्वारे *मा.डॉ.सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा शिक्षण संचालक,बालभारती,पुणे* यांच्याकडून देण्यात येत आहे,याची नोंद घ्यावी.*सूचना १* : *student पोर्टल साठी 30 सप्टेंबर 2016 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.30 सप्टेंबर 2016 या दिवशीची student पोर्टल ला असणारी माहिती ही संचमान्यतेसाठी अंतिम समजली जाणार आहे.यानंतर मुदतवाढ मिळणार नाही.**सूचना 2* : *क्लस्टर द्वारे होणारे student पोर्टल verification हे 30 सप्टेंबर 2016 पासून सुरु करण्यात येणार आहे.**सूचना ३* : *स्कूल पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी सध्या फक्त नाशिक, औरंगाबाद, अमरावती, लातूर या विभागातील जिल्ह्यांनाच लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.इतर विभागातील जिल्ह्यांसाठी लवकरच लॉगिन उपलब्ध करून देण्यात येईल.**सूचना ४* : *शालेय पोषण आहाराची माहिती अँड्रॉइड मोबाईल अँप द्वारे भरण्यासाठी दिनांक 1 सप्टेंबर 2016 ला नवीन app उपलब्ध करून देण्यात आलेले आहे,परंतु काहरे शाळांनी अद्याप ते नवीन अँप डाउनलोड न करता जुन्या अँप मधूनच सदर माहिती भरण्याचे सुरु ठेवलेले आहे अशा शाळांना नवीन अँप डाउनलोड करण्यासाठी दिनांक 28 सप्टें 2016 ही अंतिम मुदत देण्यात येत आहे.त्यानंतर जुन्या अँप मधून माहिती स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment