*इ. 1ली च्या नवीन मुलांची नोंदणी करणे*
*@ फाईल Error आली तर काय करावे @*
*1ली च्या मुलांची फाईल अपलोड करताना Create new division for master tab असा Error येत असेल तर काय करावे?*
▶ *सर्वात आधी हे लक्षात घ्या की हा प्रॉब्लेम मागील वर्षी तुकड्यांना A, B, C अशी नावे दिल्यामुळे येत आहे. तर काही मित्रांच्या शाळांचे Medium मागील वर्षी चुकले असेल तर त्यांनाही हा प्रॉब्लेम येत आहे.**पण तुकड्यांची नावे बदलण्याऐवजी बरेच मित्र Master tab मध्ये जाऊन नवीन 1 नंबर असलेली Division तयार करत आहेत.मित्रांनो असे करू नका. असे केले तर आपला प्रॉब्लेम solve होत तर नाही उलट आणखी एक Division वाढते आणि ही वाढलेली Division आपल्याला delete पण करता येत नाही.**लक्षात घ्या की आपल्याला आपल्या शाळेतील तुकड्यांची मागील वर्षी दिलेली A, B, C अशी नावे बदलून फक्त तुकडी 1,तुकडी 2,तुकडी 3 अशी करायची आहेत.आणि Medium चुकले असेल तर ते बदलायचे आहे.**मग अशा वेळी काय करायचे? तर मी सांगतो तसे करा.**1) Student portal वरील master tab मधील division ला क्लिक करा.**2) Standard मध्ये जाऊन 1ली निवडा. 1ली निवडल्यानंतर आपल्याला काही वेळातच सर्वात खाली आपल्या शाळेतील मागील वर्षी जेवढ्या तुकड्या असतील त्या सर्व दिसतात.*3) यातील पहिल्या A तुकडीला क्लिक करा. आता तुम्हाला वर त्या A तुकडीची सर्व माहिती दिसते. त्या माहितीच्या Division मधील A काढून टाका व 1 लिहा. सर्वात महत्वाची गोष्ट तुमचे मागील वर्षी Medium बदलले असेल त्या मध्ये आता बदल करा. त्यानंतर खालील General Register मध्ये तुमच्या शाळेला लागू असलेले Primary किंवा Upper Primary निवडा. Board निवडा. तुमच्या तुकडीची Strength चुकलेली असेल तर ती पण बदला.आणि सर्व झाले की खाली दिलेल्या Update button वर क्लिक करा.**Successfully Update असे आले की खालील A तुकडीची माहिती बदलून 1 झालेली दिसेल.**अशीच प्रोसेस शाळेला जर जास्त तुकड्या असतील तर प्रत्येक तुकडीसाठी करायची आहे. मात्र दुसऱ्या B तुकडीला 2 आणि तिसर्या C तुकडीला 3 असे अंक वापरा.**मित्रांनो एवढे सगळे केल्यानंतरही तुम्हाला जर अगोदर भरलेली फाईल अपलोड केल्यानंतर Error आला तर तुम्हाला आता नव्याने पुन्हा एकदा फाईल डाउनलोड करून माहिती भरावी लागेल. कारण आपण Division चे नाव बदलले आहे. तसेच Medium बदलले आहे. आणि हे अपडेट झाल्यानंतरची फाईल डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे. मग मात्र 100 % तुम्हाला Error येणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगत आहे.*
🔵 *आणखी कोणती काळजी घ्यावी.*
🔵
▶ *आधार नंबर नसेल तर NO व्यवस्थित सिलेक्ट करा.*
▶ *जनरल रजिस्टर नंबर काळजीपूर्वक भरला आहे याची खात्री करून घ्या.*
▶ *initial Standard मध्ये 1 ली निवडली का ते खात्री करून घ्या.*
▶ *मागील वर्षी अनावधानाने अनेकांचे Medium चुकले होते. ते बरोबर आहे की नाही त्याची खात्री करा.*
▶ *जास्त Division असलेल्या शाळांनी 1,2,किंवा 3 अशी Division नंबर सिलेक्ट केले आहेत का याची खात्री करून घ्या.*
▶ *सर्व माहिती पुन्हा पुन्हा तपासून मगच फाईल csv comma delimited मध्ये Convert करा.*
▶ * मित्रांनो शेवटचे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही फाईल अपलोड केल्यानंतर step 1 पूर्ण झाली की आपण भरलेली सर्व मुलांची माहिती दिसते. ती बरोबर असल्याची खात्री करून मगच step 2 ला क्लिक करा.*
▶ * अत्यंत महत्वाची गोष्ट एकदा फाईल Successfully upload झाली की नंतर मात्र कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येत नाही. म्हणून मित्रांनो जो काही बदल करायचा असेल तो फाईल अपलोड करण्यापूर्वी करा. आणि मगच फाईल अपलोड करुन टाका.*
▶ *आपल्या 1ली च्या कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
No comments:
Post a Comment