पुणे,मुंबई विभागातील जिल्ह्यांना स्टाफ पोर्टल बाबत विशेष सूचना* __________________________________________
🔸 *सूचना*
🔸
✏१) सर्वांना सूचित करण्यात येत आहे की,आंतरजिल्हा बदली इच्छुक फॉर्म भरण्यासाठी ट्रान्सफर पोर्टल मध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना *स्टाफ पोर्टल मध्ये डेटा Verify करण्यासंदर्भात जी समस्या येत होती ती समस्या काल उशिरा सोडवण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.*
✏२)जर आपली माहिती अद्याप क्लस्टर लॉगिन मधून वेरीफाय झालेली नसेल तर अशा केस मध्ये क्लस्टर ने ती माहिती वेरीफाय करावी व त्यानंतर आपणास ट्रान्सफर चा फॉर्म भरता येईल.
✏३)Open प्रवर्गातील शिक्षकांना ट्रान्सफर पोर्टल मध्ये बदली चा फॉर्म भरताना *Caste Detail Verify* करण्यासंदर्भातील Error येत होता ती समस्या आज सोडवण्यात आलेली आहे. तरी तो Error आता येणार नाही याची नोंद घ्यावी.जर तरीही *बदली फॉर्म भरताना Error आलेला दिसून आला तर अशा केस मध्ये शिक्षकांनी आपल्या स्टाफ पोर्टल मध्ये आपला धर्म व कॅटेगरी पुन्हा Update करावी.*
✏४) *काही शिक्षकांना Caste Category स्टाफ पोर्टल मध्ये भरताना Caste Certification च्या फॉर्म मध्ये Caste Category सिलेक्ट न होण्याची समस्यां येत होती ती समस्यां आता सोडवण्यात आलेली आहे.* या मध्ये आधी आपण धर्म भरावा,त्यानंतर Caste Category भरावी आणि शेवटी आपली जात कोणती आहे ती भरावी. *Open Category च्या शिक्षकांनी आपली जात कोणती आहे हे भरताना जर आपली जात तेथे Dropdown लिस्ट मध्ये दिसून न आल्यास धर्म व Category बाबत माहिती भरून Caste ची माहिती न भरता आहे तसा फॉर्म Save करावा.* Open Caste संदर्भातील माहिती क्लस्टर लॉगिन ला वेरीफाय करण्यासाठी पाठवण्याची गरज नसते.त्यामुळे स्टाफ पोर्टल मध्ये शाळा लॉगिनलाच ही माहिती Save करावी व ट्रान्सफर चा फॉर्म भरून घ्यावा.यावेळी आपणास कोणताही Error दिसणार नाही.परंतु आपली Caste Category ही Open असली तरी स्टाफ पोर्टल मध्ये सदर फॉर्म फॉरवर्ड करावयाचा नसेल तरी आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना हा फॉर्म भरून Save करणे बंधनकारक आहे हे लक्षात घ्यावे. *Open कॅटेगरी वगळता इतर कॅटेगरी ला मात्र सदर फॉर्म पूर्ण भरून क्लस्टर कडून वेरीफाय करणे बंधनकारक आहे हे लक्षात घ्यावे.*
✏
__________________________________________
*विशेष सूचना* : *पुणे व मुंबई या विभागाकरीता स्टाफ पोर्टल व ट्रान्सफर पोर्टल लॉगिन हे दिनांक १ मे २०१७ पर्यंत उपलब्ध असणार आहे.परंतु Attach-Detach, Caste Verification,school portl बंद असल्याने पासवर्ड रिसेट करण्यासाठी झालेला उशीर आणि सर्वर च्या समस्येमुळे पुणे व मुंबई विभागातील जिल्ह्यांना ही अंतीम मुदत २ मे २०१७ सायं 4 पर्यंत वाढवण्यात यात आहे,याची नोंद घ्यावी.सिस्टिम मध्ये जे काही Error आहेत ते उद्या सकाळी 11 पर्यंत दूर करण्यात येईल.*
__________________________________________
✏६) तसेच आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षक वगळता इतर शिक्षकांनी लॉगिन करून सिस्टिम वरील लोड वाढवू नये.
✏७) आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांनी स्टाफ पोर्टलला किमान *Personal Details व Caste Details* हे दोन फॉर्म भरणे व क्लस्टर लॉगिन मधून Verify करणे आवश्यक आहे,हे लक्षात घ्यावे.
✏८) स्टाफ पोर्टल मध्ये *पर्सनल डिटेल्स* माहिती भरली व क्लस्टर लॉगिन ला ती माहिती Verify केली की त्यानंतर *ही माहिती पुन्हा दुरुस्थ करण्यासाठी परत मागवता येत नाही* हे लक्षात घ्यावे.पर्सनल डिटेल्स वगळता इतर कोणतीही माहिती क्लस्टर ने वेरीफाय केली असली तरी गटशिक्षणाधिकारी यांना आपल्या स्टाफ पोर्टल लॉगिन मधून Online Request पाठवून दुरुस्थी साठी पुन्हा मागवता येते.त्यामुळे पर्सनल डिटेल फॉर्म भरताना खूप काळजी पूर्वक भरावा व Verify करावा.
✏९) ज्या शिक्षकांची मागील वर्षी स्टाफ पोर्टलला माहिती भरल्यानंतर दुसऱ्या शाळेत बदली झालेली आहे व अशा शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदली करावयाची आहे अशा शिक्षकांनी जुन्या शाळेतून Detach होऊन जुन्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी लॉगिन मधून Detach Verification करणे आवश्यक आहे.ही सुविधा कोणत्याही समस्येविना सुरु आहे हे लक्षात घ्यावे.तसेच अशा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शाळेत Attatch फॉर्म भरताना आपल्या जिल्ह्याचे नाव न दिसण्याची समस्या येत असल्याचे ईमेल प्राप्त झालेले आहे.तरी अशी समस्या आहे किंवा नाही याची खात्री करून अशी समस्या येत असेल तर ही समस्या मंगळवारी सोडवण्यात येईल याची नोंद घ्यावी.
✏१०) *ज्या शाळेचा,केंद्राचा व गटशिक्षणाधिकारी यांचा पासवर्ड विसरला आहे अशा सर्वांना सूचित करण्यात येत आहे की,कृपया आपण School पोर्टल मधून आपल्या वरिष्ठ लॉगिन मधून आपला पासवर्ड रिसेट करून घ्यावा.परंतु हा रिसेट केलेला पासवर्ड हा पुढील कार्यालयीन दिवशी स्टाफ पोर्टल ला चालू शकेल.म्हणजेच आज आपण स्कूल पोर्टल चा पासवर्ड रिसेट केला तर सदर नाविन पासवर्ड हा पुढील कार्यालयीन दिवशी म्हणजेच मंगळवार सकाळी 11 नंतर स्टाफ पोर्टल ला चालू शकेल.*
✏११) आपल्या शाळांची माहिती भरून झाल्यानंतर logout करायाला विसरू नये.बऱ्याचदा आपण logout न करता browser बंद करतो.अशांत सिस्टिम मध्ये बराच वेळ आपले लॉगिन टिकून असते.आपण logout केल्यानंतर सर्वर वरील लोड कमी होण्यास मदत होते.
✏१२) *जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा पटाअभावी अथवा अन्य कारणाने बंद झालेल्या आहेत,आणि अशा शाळेतील शिक्षक हे सध्या अन्य शाळेत कार्यरत आहेत.अशा बंद झालेल्या शाळेचे Login होऊ शकत नसल्याने असे शिक्षक ट्रान्सफर संदर्भात फॉर्म भरू शकत नाही असे लक्षात आले आहे.तरी अशा शाळांसाठी सूचित करण्यात येत आहे की,उद्या सकाळी 11 वाजेनंतर अशा शाळांच्या शिक्षकांना सिस्टिम द्वारे Detach करून verify करण्यासाठी बंद असलेल्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला फॉरवर्ड केले जातील.गटशिक्षणाधिकारी यांनी अशा शिक्षकांना वेरीफाय केल्यावर हे शिक्षक नवीन शाळेला attach करण्यासाठी उपलब्ध होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.त्यानंतर या नवीन शाळेत आपली माहितीupdate करून या शिक्षकांनी ट्रान्सफर फॉर्म भरावा.*
✏१३) मागील काही दिवसांपासून स्कूल पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद ठेवण्यात आले आहे ,परंतु स्टाफ पोर्टल चा Password हा स्कूल पोर्टल मधून रिसेट केला जातो,हा पासवर्ड रिसेट करण्यासाठी सदर पोर्टल चालू केलेले आहे,याची नोंद घ्यावी.या सुविधेद्वारे आपण आपला पासवर्ड रिसेट शकला परंतु रिसेट केलेला नवीन पासवर्ड मंगळवारी म्हणजेच दिनांक २ मे २०१७ ला सकाळी ११ वाजता स्टाफ पोर्टलला चालू शकेल हे लक्षात घ्यांवे.यापुढे स्कूल पोर्टल मधून रिसेट केलेला पासवर्ड हा पुढील कार्यालयीन दिवशी स्टाफ पोर्टलला Update होईल याची नोंद सर्वांनी घ्यावी.
✏१४) *Mdm माहिती भरण्यासाठीचे पोर्टल अद्याप बंद आहे.तरीही त्या पोर्टल मध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न करू नये.मागील दिवसांची माहिती भरावयाची राहून गेली असली तरी Mdm पोर्टल जेंव्हा सुरु होईल त्या वेळी Mdm ची मागील माहिती भरण्यासाठीची सुविधा शाळा लॉगिन ला दिली जाणार असल्याने त्याबाबत काळजी करू नये याची नोंद घ्यावी.*
✏१५) *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
================================================================================================================================================
__________________________________________
*आंतरजिल्हा बदली बाबत सूचना* __________________________________________
उद्यापासून म्हणजेच दिनांक २८/०४/२०१७ ते ०१/०५/२०१७ या मुदतीमध्ये *पुणे,कोल्हापूर,मुंबई* या विभागातील जिल्ह्यांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
*आंतरजिल्हा बदलीसाठी जे शिक्षक कर्मचारी ट्रान्सफर पोर्टल मध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाच्या सूचना* :
१) आपण जी माहिती स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल मध्ये भरणार आहात ती माहिती काटेकोरपणे व अचूक भरावी. *सध्या ही माहिती भरताना आपणास कोणतेही कागदपत्र सिस्टिम ला upload करावयाचे नसले तरी गटशिक्षणाधिकारी लॉगिन ला सर्व मूळ कागदपत्र तपासली जाणार आहे व या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती या ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठवल्या जाणार आहे याची नोंद घ्यावी*.जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरल्यास/वेरीफाय केल्यास त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याच्या सूचना मा. सचिव साहेब,ग्रामविकास मंत्रालय यांनी परवाच्या V. C. मध्ये दिलेल्या आहेत याची नोंद घ्यावी.
२) *आंतरजिल्हा बदलीसाठी ट्रान्सफर पोर्टलमध्ये अर्ज करताना आपण सेवेत कायम(Permanent) असल्याचा आदेश (स्थायित्व लाभ) आपणाकडे असणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे.आपणाकडे जर स्थायित्वाच्या लाभाचा आदेश नसेल तर आपण आंतरजिल्हा बदली साठीचा अर्ज ट्रान्सफर पोर्टल मध्ये भरू शकणार नाही.तरी ज्या शिक्षक बांधवांना आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) बदली करावयाची आहे अशा बांधवांकडे जर कायम (स्थायित्व) आदेश नसेल तर सदर कर्मचाऱ्यानी त्वरित आपल्या स्थायित्वाचा आदेश प्राप्त करून घ्यावा व त्यानुसार अर्ज करावा*.
३) आंतरजिल्हा पोर्टल गेले दोन दिवस टेस्टिंग साठी सुरु ठेवण्यात आले होते.यामध्ये माहिती भरण्यासंदर्भात कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती. तरीदेखील काही बांधवांनी या पोर्टल मध्ये माहिती भरत असल्याचे लक्षात आले आहे.तरी अशा सर्व बांधवांना सूचित करण्यात येते की,ट्रान्सफर पोर्टल उद्यापासून सुरु होत आहे.यापूर्वी *टेस्टिंग च्या काळात ट्रान्सफर पोर्टल मध्ये ज्या बांधवांनी सूचना नसताना देखील माहिती भरलेली आहे म्हणजेच दिनांक २८/०४/२०१७ वेळ सकाळी १० वाजेपर्यंत ज्यांनी माहिती भरलेली आहे त्यांची ही भरलेली माहिती उद्या सकाळी १० वाजता पूर्णतः delete केली जाणार आहे याची नोंद घ्यावी*.अशा सूचना नसताना माहिती भरलेल्या शिक्षक बांधवांना विनंती आहे की आपण पुन्हा माहिती भरावयाची आहे.आम्ही माहिती भरलेली आहे या समजुतीत आपण राहून पुन्हा नव्याने माहिती भरली न जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही ही शक्यता गृहीत धरून आपणास ही सूचना देण्यात येत आहे हे लक्षात घ्यावे.
४) बदली संदर्भात *whatsapp,facebook किंवा इतर सोशल माध्यमातून वेगवेगळे मेसेज येत असतात हे आपणास माहिती आहेच.परंतू सरल स्टाफ पोर्टल ट्रान्सफर पोर्टल,वरिष्ठ कार्यालय व राज्यस्तरीय सरल व्हाट्सअप्प ग्रुप व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून आलेल्या सूचना वाचून फॉर्म भरताना आपण विशेष काळजी घ्यावी.वाचनात आलेल्या सुचनांबाबत शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवावा किंवा नाही ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे.आपली एक चूक आपणास बदली वा अन्य महत्वाच्या प्रक्रियेपासून आपणास वंचित ठेवू शकते हे लक्षात घ्यावे.*
५) स्टाफ पोर्टल मध्ये माहिती भरून क्लस्टर/केंद्रप्रमुख यांच्या लॉगिन मधून सदर माहिती वेरीफाय केल्यानंतरच सरल ट्रान्सफर पोर्टल मधून आपण आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरावयाचा आहे.हा फॉर्म आपण आपल्या शाळेच्या लॉगिन मधून भरावयाचा आहे. *ज्या कर्मचाऱ्याना शाळेच्या लॉगिन मधून आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरणे शक्य नसेल अशा कर्मचाऱ्यासाठी गटशिक्षणाधिकारी लॉगिन मधून देखील हा फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी*.मात्र शाळा अथवा गटशिक्षणाधिकारी लॉगिन मधून आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरण्यासाठी एक महत्वाची अट अशी आहे की *आपली स्टाफ पोर्टल ला माहिती भरून ती माहिती क्लस्टर लॉगिन मधून वेरीफाय असणे आवश्यक आहे.वेरीफाय नसलेली माहिती असणाऱ्या कर्मचाऱ्यास कोणत्याही परिस्थितीत बदलीसाठीचा फॉर्म भरता येणार नाही.*
६) स्कूल पोर्टल,स्टाफ पोर्टल व ट्रान्सफर पोर्टल चा User Id व पासवर्ड हा एकच असून जर हा पासवर्ड आपण विसरला असाल तर हा पासवर्ड स्कूल लॉगिन मधून रीसेट करावयाचा आहे हे लक्षात घ्यावे.स्कूल पोर्टल मधून पासवर्ड रिसेट केल्यानंतर एका तासाने नवीन पासवर्ड स्टाफ पोर्टल लॉगिन करताना वापरावा हे आपणास माहिती आहेच.परंतु *सध्या स्कूल पोर्टल काही तांत्रिक अपडेशच्या कारणास्तव मागील 3 दिवसापासून बंद (Downtime) आहे.त्यामुळे ज्या शाळणाचा पासवर्ड विसरला असेल अशा शाळांना स्टाफ अथवा ट्रान्सफर पोर्टल ला लॉगिन करण्यासाठी समस्या येऊ शकते.तरी या पोस्ट द्वारे सर्वांना सूचित करण्यात येत आहे की लवकरच स्कूल पोर्टल सुरु होणार असून आपली ही समस्या सोडवली जाणार आहे.त्यामुळे याबाबत अधिक काळजी करू नये.*
टीप: दोन दिवसांपासून स्टाफ पोर्टल सुरु केले असल्याची सूचना देण्यात आलेली होती ही बाब खरी असली तरी काही *अपडेशनच्या कारणांमुळे प्रत्यक्ष लॉगिन होताना invalid id व invalid पासवर्ड अशी सूचना दिली जात होती.त्यामुळे आपला पासवर्ड चुकलेला आहे असा समज निर्माण झालेला आहे.परंतु उद्यापासून स्टाफ पोर्टल व ट्रान्सफर पोर्टल सुरु केले जाणार असल्याने ही समस्या बऱ्याच प्रमाणात संपुष्टात येईल,त्यामुळेV पासवर्ड बाबत अधिक काळजी करू नये*.